
लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाटप सुरू
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना पुन्हा यशस्वीपणे कार्यान्वित झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात, आधार सिंडीग राहिलेल्या सुमारे १२,८७,५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेमुळे महिला सशक्तीकरणाला चालना मिळणार असून, राज्यभरात महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
