लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून शासन पैसे परत घेणार की नाही ? जाणून घ्या शासनाचा निर्णय.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि त्या आता अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, यापुढे त्यांना ही योजना लागू राहणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

शासनाच्या स्क्रुटीनीनुसार आत्तापर्यंत 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत.

त्यामध्ये 2 लाख 30 हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत.

एक लाख 10 हजार महिला वय वर्षे 65 पेक्षा जास्त आहेत.

कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००

एकुण अपात्र महिला – ५,००,०००

सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !