Aarogy Vibhag Bharti 2024

Aarogy Vibhag Bharti 2024

युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अंतर्गत मंजूर असलेल्या पदभरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात विहीत मुदतीत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. तरी उत्सुक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभाग नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. भरतीची जाहिरात युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

  • भरती विभाग : मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
  • भरती प्रकार : आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
  • पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
  • मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 ते 70,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
  • अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
  • निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
  • वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.

पदाचे नाव व इतर पात्रता :

  • प्रकल्प समन्वयक :
    1] वैद्यकीय क्षेतील पदवी (MBBS/BAMS/BHMS) व MPH.
    2] MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तालुका समन्वयक : 1] MSW
    2] MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
  • नोकरी ठिकाण : सिन्नर व सुरगाणा, जिल्हा नाशिक.
वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मासिक मानधत असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र उमेदवारां पैकी सुरगाणा व सिन्नर तालुक्यातील स्थानिक उमेदवारास प्राधान्य राहील.
वरील पद एकत्रित मानधनाची असून, त्यांचा कालावधी ०६ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
बुनिसेफ कडुन सदर पदांना मान्यता न मिळाल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास गार्च देय राहणार नाही.
अर्जाचा नमुना हा जाहिरातीसोबत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडले नसल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.

विहीत नमुन्यातील अर्जासोबत

 १) ई-मेल आयडी, बयाचा पुरावा.
२) पदवी / पदविकार शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिपः सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये)
३) गुणपत्रिका
४) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करुन जोडण्यात याव्यात व तसेच पडताळणीसाठी मुळ कागदपत्रे सोबत ठेवावीत.

पात्र उमेदवारास मुलाखतीचा दिनांक व वेळ दुरध्वनी व ईमेल द्वारे कळविण्यात येईल.

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल

भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार, इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार हे प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत.

शेवटची दिनांक

09 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक, जिल्हा रुग्णालय आवार.

ई- मेल पत्ता

 hfwtcunicef@gmail.com

अधिक माहितीसाठी खालील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

तुम्ही जर आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक, युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प अंतर्गत प्रकल्प समन्वयक, तालुका समन्वयक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 04 पदे भरली जाणार आहेत. त्यांना मानधन प्रकल्प समन्वयक: रु. ७०,०००/- दरमहा, तालुका समन्वयक: रु. ३५,०००/- दरमहा दिले जाणार आहे.

अधिकृत जाहिरात
अर्ज